जळगाव : नशिराबादेत टोळक्याकडून विवाहितेची छेडखानी; 36 संशयितांवर गुन्हा

 जळगाव : नशिराबाद (ता. जळगाव) येथे पतीसह दुचाकीवरून दवाखान्यात जात असलेल्या महिलेला उद्देशून गावातील टवाळखोरांनी शेरेबाजी केल्याची घटना घडली होती. त्याचा जाब विचारल्याने पती-पत्नीसह त्यांच्या कुटुंबावर काठ्या, दगड-विटा, लोखंडी रॉडने हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत ८ जखमी झाले असून नशिराबाद पोलिस ठाण्यात ३६ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

नशिराबाद गावातील रहिवासी साजिद फरीद शाह (वय २४) मंगळवारी (ता. २) त्यांची पत्नी शैनीला बी शाह हिला दुचाकीवरून दवाखान्यात घेऊन जात होते. यावेळी गावातील शिवाजी चौकामध्ये टवाळखोर शरीफ पिंजारी याने साजिद शाह व त्यांची पत्नी शैनीला यांना उद्देशून आक्षेपार्ह शेरेबाजी केली. कुणाला बोलला असे विचारले असता शरीफ पिंजारी याने साजिद शाह यांच्या कानशिलात लगावली.

यानंतर साजिद शाह वडील आणि भावाला सोबत घेत पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना यावेळी पुन्हा शरीफ पिंजारी याने साजिद शाह यांच्या वडील व भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी साजिद शाह याचे कुटुंबीय नातेवाईक हे आले असता शरीफ पिंजारी याच्यासह त्यांच्यासोबत ३० ते ३५ जणांनी साजिद शाह यांच्यासह त्यांच्या कुटुंबीय नातेवाइकांना मारहाण केली. या घटनेत साजिद फरीद शाह, जावेद फरीद शाह, फरीद चाँद शाह, आरिफ शरिफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कान बी मुस्ताक शाह, रिजवाना बी फजल शाह, सलीम नुरा शाह हे आठ जखमी झाले आहेत.

दंगलीत जखमी

साजिद शाह फरीद शाह, जावेद शाह, फरीद शाह चाँद शाह, आरीफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कानबी मुश्ता शाह, रिजवाना शाह अशा जखमींवर उपचार झाल्यानंतर त्याचे जाबजबाब नोंदवण्यात येऊन संशयितांविरुद्ध दंगलीच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलिसांतर्फे अटकसत्र राबवण्यात येत आहे.

३६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी साजिद शाह यांच्या तक्रारीवरून शरीफ रज्जाक पिंजारी, आरिफ शरीफ पिंजारी, मोहसीन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकील रज्जाक पिंजारी, शाकीर शकील पिंजारी, जहिर बिस्मील्ला पिंजार, आसिफ पिंजारी, बशीर पिंजारी, बबलु पिंजारी, जावीद बशीर पिंजारी, आबीद बशीर पिंजारी, आसिफ रशीद पिंजारी, अय्युब निजाम पिंजारी, रईस मुसा पिंजारी, मुसा निजाम पिंजारी, रईस रमजान पिंजारी, आसिफ रमजान पिंजारी, मोहसीन रमजान पिंजारी, इम्रान रमजान पिंजारी, फारुक पिंजारी, गोलू पिंजारी, साबीर पिंजारी, आसीफ पिंजारी, रऊफ पिंजारी, नवाज पिंजारी, मुस्ताक पिंजारी, जावीद पिंजारी, आरीफ रशीद पिंजारी, इक्बाल हारुन पिंजारी, रहेमान रज्जाक पिंजारी, इरफान रहेमान पिंजारी, शरीफ रज्जाक पिंजारी (सर्व रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) या ३६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e