महिलेला जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळून आले.
तातडीने रुग्णालयात केले दाखल, मात्र…
याविषयी देहूरोडचे सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील म्हणाले, की संगीता भोसले या सकाळी आठच्या सुमारास दूध खरेदीसाठी त्यांच्या दुचाकीवरून दुकानात गेल्या. तेथून इंद्रपुरी येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांच्या घरी जात असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर त्या खाली कोसळल्या होत्या. इंद्रपुरी येथील भंडारी व्हिलाजवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या. रस्ता खराब असल्याने त्या स्कूटरवरून घसरून अपघात झाला असावा, अशी प्रथमदर्शनी शक्यता दिसून आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
पुढे त्यांनी सांगितले, की त्यांना जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळून आले. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संगीता भोसले यांचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे त्यांचा कोणाशी अलिकडील काळात काही वाद झाला होता का, यासह विविध अंगाने पोलीस तपास करीत आहेत
0 Comments