शाळकरी मुलीची छेड भोवली; रोडरोमियोला 3 वर्षे सश्रम कारावास

 जळगाव : पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत छोट्याशा गावात राहणाऱ्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून भडगाव तालुक्यातील रोडरोमियो छेड काढत असे. एका दिवशी तिचा विनयभंग केल्यावर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली.

दाखल गुन्ह्यात खटल्याचे कामकाज होऊन जिल्हा न्यायालयाने आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

आठवीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पिच्छा पुरवत तिची छेडखानी सुरु होती. संशयित नेहमी तिच्या शाळेत येण्याजाण्याच्या मार्गावर आणि गावात पाठलाग करत होता. पीडितेने कुटुंबात अगोदरच घडला प्रकार सांगितला होता. एकदा ती शाळेतून परतत असताना तिचा हात धरुन विनयभंग केल्यावर मुलीच्या मामाने विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९, रा. भडगाव) याला पकडून पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस ठाण्यात पिडीतेच्या तक्रारीवरून (ता. जुलै २०१७) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोक्सोअंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण होवून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुरु होते.

दाखल खटल्यात पीडित मुलगी, तपासाधिकारी यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली, प्राप्त पुरावे साक्षीदारांच्या साक्ष आणि दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ युक्तिवादानंतर संशयित विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९) याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्या. महाजन यांच्या न्यायालयाने संशयितास ३ वर्षे सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e