पुणे : खराडी येथे कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून केलेल्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून केल्याचे उघड झाले असून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने याप्रकरणी दोघांना सोलापूर येथून अटक केले आहे.
संतोष सत्यवान शिंदे (वय २८ बिदर, राज्य कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) व संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर अक्षय प्रकाश भिसे (वय २६, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे राहणाऱ्या अक्षय भिसे या तरुणाचा २१ ऑगस्ट रोजी सकाळी तो कचरा वेचण्यासाठी गेला असताना दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलिस व गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडून सुरु होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, हरीश मोरे, प्रवीण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.आरोपींनी मोबाईलवर गुन्हेगारीशी संबंधित वेब सिरीज, मालिका व चित्रपट पाहिले होते. त्याच आधारे त्यांनी अक्षयला संपविण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून पिस्तूल खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा सुक्ष्म अभ्यास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.
- जयंत राजूरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट चार
- जयंत राजूरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट चार
0 Comments