50 मोबाईल चोरले म्हणत सतरा वर्षीय मुलाचे सिनेस्टाईल अपहरण

औरंगाबाद : सतरा वर्षीय परप्रांतीय युवकाला बळजबरीने कारमध्ये बसून सिनेस्टाईलने अपहरण केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद येथील पाचोड येथील आठवडी बाजारात घडली. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी 24 तासांत सुखरूप शोधून काढले आहे.
आतापर्यंत अपहरण झालेल्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु औरंगाबादच्या पाचोड येथील आठवडी बाजारातून एका सतरा वर्षीय परप्रांतीय मुलाचे सिनेस्टाईल अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे अपहरणानंतर या मुलाने 50 मोबाईल चोरले म्हणून त्याला पळवून नेल्याचे सांगत आरोपींनी त्याला सोडवण्यासाठी चक्क तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. मुकेश राजाराम निगवाल (रा. बऱ्हाणपूर असे सतरा वर्षीय मुलाचे नाव असून तो कामानिमित्त एकटाच पाचोडला राहतो. अपहरणानंतर पोलिसांनी या मुलाच्या अवघ्या 24 तासांत शोध घेतला आहे. परंतु अपहरणकर्ते मात्र अद्यापही फरार आहेत.

फोन करून मागितले पैसे

पाचोड येथील मोसंबीच्या मार्केटमध्ये रोजगारासाठी मुकेश निगवाल आला होता. रविवारी त्याने सलूनमधून कटिंग करत असताना त्याला बाजारातून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून नेण्यात आले. यानंतर त्यासोबतच्या परप्रांतीय कामगाराच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींचा फोन आला. त्याने सांगितले की, तुमचा साथीदार मुकेशने आमचे 50 मोबाईल चोरले आहेत. यामुळे त्याचे अपहरण केले असून त्याला सोडवायचे असल्यास 3 लाख रूपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी मुकेशच्या साथीदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिस ठाण्यात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीतच या संपूर्ण घटनेमुळे पाचोड परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e