औरंगाबादमध्ये : येथे खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. एका हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाब मध्ये हे दोघे जण एकाच रुममध्ये २९ जुलैपासून राहत होते. काल मंगळवारी रात्री उशीरा दोघेही रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
सागर राजेंद्र बावणे आणि सपना अंकुश खंदारे अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये स्टेशन रोड परिसरातील हॉटेल पंजाब मध्ये एक प्रेमीयुगुल मागील सहा दिवसांपासून राहत होते. परंतु, काल रात्री हे दोघेही बेशुद्ध झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, उपचाराआधीच त्यांच्या मृत्यू झाला होता. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात राहणारी सपना अंकुश खंदारे आणि सिडको भागातील सागर राजेंद्र बावणे या दोघांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याचा वेदांत नगर पोलीस तपास करत आहेत.
0 Comments