जळगाव : जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या मनोज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. महावितरण विभागाचे कर्मचारी अक्षय महाजन हे अधिकाऱ्यांसह वीज चोरी करणारे आकडे काढण्यासाठी मंगळवारी एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात गेले होते. या दरम्यान गावात मनोज पाटील यांचे आकडे काढल्यावर तो वीज कर्मचारी अक्षय महाजन यांच्या मागे मोठा दांडका घेऊन मागे लागला. तसेच हातातील भल्या मोठ्या दांडक्याने वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
0 Comments