सांगली : जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना जावायासह अटक

राजकीय आशीर्वादाने गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सांगलीत तळ ठोकून असलेल्या जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यास एक लाखाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या रंगेहात अटक केली. त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या जावयालाही अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह दुरुस्ती व मजूर पुरवठा करण्याचा ठेका ई-निविदेच्या माध्यमातून मंजूर झाला असताना संबंधित ठेकेदाराकडून कार्यारंभ आदेश देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावला होता. शुक्रवारी रात्री अभियंता सुर्यकांत नलवडे आणि त्याचा जावई राहुल कणेगावकर या दोघांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उप अधिक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे व अन्य कर्मचारी यांच्या पथकाने केली.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e