मिळालेल्या माहितीनुसार, बोधळापुरी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पोलीस सूत्रांच्या मदतीने आरोपी महादेव कडुकर याचा शोध घेवून त्याला अटक केली. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली असल्याचं कबुल केलं.
0 Comments