जळगाव : जळगाव तालुक्यात घरकुल योजना व स्वच्छ भारत अभियानात उदिष्ट पूर्ती न करणाऱ्या जळगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत
जळगाव तालुक्यातील विविध योजनांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व समावेशक आढावा घेतला. यावेळी घरकुल योजना व स्वछ भारत अभियान या योजनांमध्ये उद्दिष्टापेक्षा कमी काम करणाऱ्या जळगाव तालुक्यातील उमाळे येथील ग्रामसेवक किरण कल्याण लंके, तसेच धानवड येथील ग्रामसेवक सुनील विठ्ठल चौधरी यांचेवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलंबनाची कारवाई केली आहे
अगोदर धरणगाव तालुक्यात कारवाई
गुरुवार (25 ऑगस्ट) धरणगाव पंचायत समिती येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत याच कारणासाठी दोघा ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या आढावा बैठकीत विविध मुद्द्यावर आढावा घेताना दप्तरात अपूर्णता असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचे सखोल दप्तर तपासण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. आता घरकुल योजना व स्वच्छ भारत योजनेतील कामावरून जळगाव तालुक्यात कारवाई झाली आहे
0 Comments