प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जुने धुळे येथील गुरुकन्हय्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचे अध्यक्ष अशोक बन्सीलाल कोटेचा, उपाध्यक्ष, खजिनदार, चिटणीस, उपचिटणीस (नावे माहीत नाही) व मुख्याध्यापिका रेखा बुधाजी चौधरी (रा. ग. नं. ५, माधवपुरा, धुळे) यांनी संगनमताने बोगस पटसंख्या दाखविली. तसेच पोषण आहार, पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका शासनाकडून प्राप्त करुन त्या काळ्या बाजारात विक्रीतून शासनाची दोन लाख १९ हजार ५८१ रुपयांत फसवणूक केली. त्यामुळे संबंधित सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जे. पावरा तपास करीत आहेत.
उर्दू शाळेकडूनही ३३ लाखाची फसवणूक
जिल्ह्यात २०११- २०१२ मध्ये जिल्ह्यातील शाळांची पटसंख्या पडताळणी झाली. तीत काही शाळांची पटसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळली. तरीही काही शाळांनी पोषण आहारासह विविध प्रकारचा लाभ घेतला. त्यानुसार त्यांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली. त्यामुळे काही शाळांनी कागदपत्रे सादर केली, तर काहींनी रकमेचा भरणा केला. प्रतिसाद न देणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाईचा बडगा उचलला जात आहे. देवपूरमधील एका उर्दू शाळेनेही सुमारे ३३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने कारवाई केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.
0 Comments