सोनगीर टोल नाक्यापासून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गाव खेड्यातील नागरिकांना रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने धुळे शहरामध्ये ये जा करावी लागते. या दरम्यान ग्रामस्थांना टोल प्रशासनातर्फे टोल भरण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही.
टोल माफ करा
टोल नाक्याजवळील जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावरील गावातील ग्रामस्थांना टोल माफ करण्यात यावा किंवा टोल आकारणीमध्ये सवलत देण्यात यावी; ही मागणी वारंवार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. टोल प्रशासनातर्फे या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे टोल प्रशासनाच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
0 Comments