धुळे : शहरापासून काही अंतरावर असलेल्या नगाव परिसरामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. हाणामारी संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
धुळ्यात गॅंगवाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा जुन्या वादातून गँगवार झाला असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस गँगवारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे या गॅंगवरच्या घटना रोखण्याच आव्हान धुळे पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
दोन जण ताब्यात
जुन्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती उघडकीस आली असून या दोन गटातील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाकी जण अद्याप फरार आहेत त्यांचा शोध पश्चिम देवपूर पोलीस घेत आहेत
0 Comments