गुहागर : तालुक्यातील एका गावातील दोन महिला, तीन अल्पवयीन मुली आणि चार मुले काल (ता. ५) सायंकाळपासून बेपत्ता होती. रात्रीपर्यंत यापैकी कोणीही घरी परत न आल्याने गावात तणावाचे वातावरण होते. रात्री बाराला गुहागर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या १२ तासांत आज दुपारपर्यंत या सर्वांना शोधण्यात पोलिसांना यश आले.
काल दुपारी चारच्या सुमारास या गावातील एका मोहल्ल्यातील दोन महिला स्वत:च्या प्रत्येकी दोन मुलांसह (मुलांचे वय ९, ६, एक वर्ष आणि चार महिन्यांचे बाळ) आपल्याबरोबर १७ , १३ आणि ११ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींना घेऊन बाहेर पडल्या. गावातील डॉक्टरांकडे जाऊन येतो, असे या महिलांनी घरात सांगितले होते. त्यामुळे कोणालाच संशय आला नाही. सायंकाळपर्यंत या महिला, मुले आणि अल्पवयीन मुलींसह परत आल्या नाहीत. त्यामुळे मोहल्ल्यात घबराट निर्माण झाली. ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पालथा घातला. आसपासच्या परिसरात एका ट्रस्टचे रुग्णालय आहे. तिथपर्यंत नातेवाईक पोचले. परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी ‘अशा कोणी महिला मुलांसह इथे आल्याच नाहीत’, असे सांगितले.
0 Comments