अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

 जळगाव : सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सध्या पावसाळा असल्याने वाळूगटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसांत वाळू उपसा पूर्णपणे बंद असतो. असे असूनही जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यावर त्यांनी पथक नेमून कारवाईबाबत सूचित केले.

त्यानुसार गुरुवारी (ता.४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाने सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोडवरील आर्यन पार्कजवळ वाळूने भरलेले (एमएच १९ पी ४०९७) ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.

पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याबाबत कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन जळगाव तालुका ठाण्यात ट्रॅक्टर चालक संजय रामदास सपकाळे (वय-५२) रा. रथ चौक, कोळीपेठ, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e