लातूर - पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध ३ दिवसात १५६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच लातूर ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा मारत जुगारचे साहित्य, रोख रक्कम असा १ लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच ११ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते. ६ ते ८ ऑगस्ट पर्यंत अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत जुगार कायदा, दारूबंदी कायदा, जीवनाशक्य वस्तू अधिनियम प्रमाणे कार्यवाही करून जिल्हाभरात विविध पोलीस स्टेशनला केवळ ३ दिवसात १५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोहीम अंतर्गत पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतील चांडेश्वर शिवारातील एका ठिकाणी छापा मारला.
स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना शंकर खंडेराव शितळकर, दीपक सुभाष सुरवसे, सिद्राम गणपत साठे, ज्योतीराम शहाजी काळे, इब्राहिम अन्वर शेख, एजाज मोहम्मद हुसेन, अल्फर झह र शेख, निशिकांत गणेश उडगे, दशरथ प्रभू देवकते, लखन सुरनर व एक अनोळखी फरार व्यक्ती यांचा समावेश आहे या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments