पाचोरा (जळगाव) : रक्षाबंधनासाठी बहिणीला घेण्यासाठी आलेल्या भावास बहिणीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. हे दृश्य पाहून भावाने हंबरडा फोडत बहिणीची आत्महत्या नसून सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला व सासरच्यांना कठोर शिक्षेची मागणी हुंदके देत केली
भोपाळ येथील प्रिया देव (वय २६) हिचा विवाह पाचोरा येथील गणपतीनगरातील रहिवासी व एमएसएफ सेवेत कार्यरत असलेले विनोद सुरवाडे यांच्याशी गेल्या ३० ऑगस्ट २०२१ ला झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून अनेकदा खटके उडत होते. त्याबाबत प्रियाने आपल्या माहेरच्यांना कल्पना दिली होती. विनोद व प्रिया यांच्यात रविवारी (ता. ७) सकाळपासूनच भांडण सुरू झाले. याबाबत प्रियाने आपली बहिण दीपाली हिला मोबाईलवरून कल्पना दिली. दीपालीने आपल्या भावासही तसे कळवले.
भाऊ पोहचला अन्
भाऊ देवेन देव त्याने येत्या दोन, तीन दिवसांवर रक्षाबंधन आहे, त्यासाठी प्रियाला घेऊन येऊ व तिच्या पतीसह सासरच्या समजवू, असा विचार केला. देवेन देव आपले मेहुणे शशांक शेजवाल यांना घेऊन रविवारी (ता. ७) रात्री पाचोरा येण्यास निघाले. आम्ही येत आहोत, असे त्याने बहीण प्रियालाही कळवले होते. देवेन व शशांक हे दोघे आज (ता. ८) पहाटे पाचोरा येथे पोहोचले. याच वेळी विनोदची मामी प्रियाला उठवण्यासाठी गेली असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. याच वेळी मृत प्रियाचे भाऊ व मेहुणे हे घरी पोहोचले. बहिणीला घेण्यासाठी आलो आणि तिचा मृतदेह पाहायला मिळाला हे पाहून भाऊ देवेन याने हंबरडा फोडला व बहीण आत्महत्या करूच शकत नाही, तिची हत्या झाल्याचा आरोप करत त्याने चौकशी व कारवाईची मागणी केली
0 Comments