धुळे येथे ११११ फूट लांबीचा झेंडा घेऊन काढण्यात आली तिरंगा रॅली

 धुळे : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धुळे शहरातून आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅली दरम्यान 1 हजार 111 फुट लांबीचा तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन धुळे  शहरातून या भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली

भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक धुळे भाजपा  जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले. या रॅलीदरम्‍यान सहभागींनी भारत माता की जय..घोषणाबाजी केल्‍याने परिसरात स्‍वातंत्र दिनाचे वातावरण निर्माण झाले होते.

धुळेकरांचा सहभाग

धुळे शहरातील अग्रसेन पुतळा परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर धुळे शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा व चौकांमधून ही भव्य रॅली मार्गस्थ करण्यात आली. या रॅली दरम्यान भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह महापौर प्रदीप कर्पे, खासदार सुभाष भामरे सहभागी झाले होते. त्याच बरोबर हजारोंच्या संख्येने धुळेकर नागरिक देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झाले असल्याचे बघावयास मिळाले आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e