बायकोसाठी कायपण! नांदायला येत नाही म्हणून नवरा चढला ४४० व्होल्टच्या टॉवरवर

माणगाव : नवरा-बायकोमध्ये भांड्याला भांड लागतं, म्हणजेच क्षुल्लक कारणावरुन वाद-विवाद होत असतात, असं म्हणतात. पण रायगडमधील  माणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बायको नांदायला घरी येत नाही म्हणून नवरा चक्क चाळीस मीटर उंच टॉवरवर चढला. अनिल असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने ४४० केव्हीपेक्षा अधिक विद्युत प्रवाह असणार्‍या हायहोल्टेज लाईनच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बायको नांदायला  घरी येत नाही म्हणून आदीवासी तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. इंदापुर आदीवासी भागात राहणारा अनिलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पठ्याने आपल्या सासुरवाडीत म्हणजे कोस्ते आदीवासी वाडीजवळ असलेल्या 40 मिटर उंच आणि 440 KV पेक्षा अधिक विद्युत प्रवाह असणार्‍या हायहोल्टेज लाईनच्या टॉवरवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
शोले चित्रपटापेक्षा थरारक आणि भयानक दृष्य लाईव्ह बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अखेर माणगावचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील,सह पोलिस निरिक्षक नवनाथ लाहंगे,सतिष आस्वर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अनिलला खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर अनिल टॉवरवर खाली उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e