मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेच्या या तीन अधिकाऱ्यांनी एका बांधकाम विकासकाकडे जून महिन्यात ४० हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीला खबर मिळताच त्यांनी आरोपीं विरोधात सापळ रचला. रुपाली संखे,हितेश जाधव आणि गणेश झणके लाच स्विकारण्यासाठी गेले असता ठाणे एसीबीने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंध विभागाने तिघांना लाच घेतना बिलालपाडा येथे अटक केली आहे.'
0 Comments