जळगाव येथे अल्‍पवयीन मुलांना लावून दुचाकी चोरी; नऊ दुचाकी हस्‍तगत

जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्‍या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्‍या आहेत. याचा शोध घेत पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. याकरीता अल्‍पवयीन मुलांचा वापर केला जात असल्‍याचे समोर आले आहे. संबंधीताकडून चोरीच्या ९ दुचाकी  हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
 जळगाव  शहरातून दुचाकी चोरी करायच्या व त्यांची विल्हेवाट लावायचे काम दादा बारकू ठाकुर करत होता. त्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तत्‍पुर्वी दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलाला पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

अल्‍पवयीन मुलांकडून चोरी

दुचाकी चोरीच्या रोजच्या होत असलेल्‍या घटना पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या. पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरी करीत असल्याचे समोर आले. याबाबतचे पुरावे देखील पथकाला मिळून आले. त्याला ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e