ओमप्रकाश मेश्राम (वय 40) असे मृतक ठेकेदारांचे नाव असून ओमप्रकाश याच्या हत्येप्रकरणी क्रिष्णा चापरे (वय 24), राकेश मंदुरकर (वय 25) या आरोपींना अटक केली आहे. यात दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. मृतक ओमप्रकाश यांचे आरोपीसोबत जुन्या एका कारणाने वाद सुरु होता. दोघेही एकमेकांना पाण्यात बघत होते. दरम्यान आज दुपारी मृतक आपल्या मेंढा येथील बांधकाम साइडवर व्यस्त असताना आरोपी क्रिष्णा आणि राकेश आपल्या दोन मित्रांसोबत आला.
भांडण सुरू करत फावड्याने हल्ला
त्यांनी ओमप्रकाश सोबत भांडण सुरू केले. यात वाद इतका विकोला गेला की क्रिष्णा आणि राकेशने बांधकामात वापर होणाऱ्या फावड्याने ओमप्रकाश यांच्यावर वार करून फरार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या ओमप्रकाश यांना लागलीच त्याच्या कामावरील मजूरांनी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याची माहिती भंडारा शहर पोलिसांना होताच त्यांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तपास चक्रे फिरवत दोन आरोपिला अटक केली असून अद्याप 2 फरार आरोपीचा शोध सुरु आहे
0 Comments