अंबड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून पती-पत्नीने संपवली जीवनयात्रा

अंबड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार भाषण करताना आत्महत्या मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा ताजी असतानाच, जालना जिल्ह्यात एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केलीय. पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

अंबड तालुक्यातील वडीकाळ्या या गावात ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय ढेबे (वय 45) आणि संगीता ढेबे (वय 40) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सदरील घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

या दोघांनीही आत्महत्येसारखं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ढेबे कुटुंबाच्या शेजाऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांच्या कानावर हा प्रकार घातला. 

दरम्यान, एका खासगी बॅंकेचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे या विवेचनेतून पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. असा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e