दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरीवाडीतील हत्येच्या प्रकरणात बशरणप्पा दिंडोरे , त्याचे वडील शिवानंद दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे आणि सिद्धाराम दिंडोरे अशी या आरोपींची नावे आहेत. यातील मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांची बहीण भागिरथी आणि आरोपी शरणप्पा आणि इतरांमध्ये शेतजमिनीचा वाटणीचा वाद होता.
नेमकं काय घडलं होतं ?
बहीण भागिरथी हिच्या वाटणीला येणारी शेतजमीन देण्यास आरोपी टाळाटाळ करीत होते. तेव्हा या वादात मृत मल्लिकार्जुन दिंडोरे यांनी बहिणीच्या बाजूने हस्तक्षेप करून वाद मिटविला होता. परंतु हा वाद आमच्या परस्पर का मिटविला, असा सवाल करीत आरोपींनी मृत मल्लिकार्जुन यांच्याशी वाद घातला. १९ मार्च २०१७ रोजी मृत मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या वस्तीवर आपले बंधू मधुकर आणि इतरांशी गप्पा मारत थांबले होते. तेव्हा आरोपी शरणप्पा दिंडोरे हा त्याचे वडील आणि चुलत्यांसह दुचाकीने तेथे आला.
शेतजमिनीच्या वाटणीचा वाद आमच्या परस्पर कसा मिटविला, याचा जाब विचारत शरणप्पा दिंडोरेने भांडण काढले. त्यानंतर सोबत आणलेल्या बंदुकीने मल्लिकार्जुन यांच्यावर गोळी झाडली. बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यात शिरल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होऊन पोलिसांनी तपासाअंती आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याचा आज निकाल लागल्याने तब्बल ४ वर्षाने न्याय मिळाला आहे
.
0 Comments