प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होताच मच्छीमारांची झुंबड

नंदुरबार : मागील महिनाभरात अधून मधून पाऊस सुरूच आहे. यामुळे तापी नदीला पुर कायम राहिला. यात नंदुरबार जिल्‍ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडे होते. परंतु, आता ते बंद झाले असल्‍याने  प्रकाशा बॅरेजच्‍या पुढे पुर ओसरला आहे. यामुळे आता मच्‍छीमारांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे गत १५ दिवसांपासून उघडण्यात आले होते. प्रकाशा येथील चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने पाणी बाहेर पडत होते. दरम्यान पाऊस कमी झाल्याने आणि हतनूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने बॅरेज प्रकल्पांना दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. हे दरवाजे बंद झाल्यानंतर काही वेळात नदी पात्रात मच्छीमार बांधवांची अशी झुंबड उडाली होती.

एकाचवेळी अनेक जाळे

नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मिळण्याची शक्यता असल्याने एकाचवेळी अनेक जण जाळं घेत पाण्यात उतरले होते. यातून प्रकाशा पुलावरुन नदीपात्रात मच्छीमारांची शाळाच भरल्याचे दिसून आले. यातून अनेक मच्छीमारांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e