धुळे : शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या सुयोगनगर परिसरातून भररस्त्यात एका महिलेच्या गळ्यातून सोनपत तोडून दुचाकी धारकांनी पोबारा केला होता. या संदर्भात सदर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता शहरातीलच दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत
महिलेच्या अंगावरून ओढून पळवलेली मंगलपोत शहरातीलच एका सोनाराला या चोरट्यांनी विकली असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने संबंधित सोनाराकडून देखील ही मंगलपोत हस्तगत केली. पुढील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग त्याचबरोबर पश्चिम देवपूर पोलिसांतर्फे केली जात आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी माहिती दिली आहे.
0 Comments