सांगली येथील एलसीबीनं नवीन वसाहतीत प्लास्टिकच्या पाेत्यात तलवारी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी रोहित राजू कुसाळकर या युवकास अटक केली आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित कुसाळकर हा तलवारी व कोयता घेऊन थांबल्याची माहिती एलसीबीचे पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीनं नवीन वसाहतीजवळ सापळा रचला. ज्या ठिकाणी रोहित थांबला हाेता. तेथे जाऊन त्यास पाेत्यात काय आहे असं पाेलिसांनी विचारलं. त्याने काही नाही असे उत्तर दिलं. पाेलिस त्याला खाेदून खाेदून विचारत हाेते. परंतु ताे उडवाउडवीची उत्तरे देत हाेता.
अखेर त्याला पाेलिसी खाक्या दाखवताच ताे घडाघडा बाेलू लागला. पाेत्यातील तलवारी व कोयता कुठून आणला असे त्यास पाेलिसांनी विचारले. परंतु त्यावेळी देखील उडवा उडवीची उत्तरे देत हाेता. राेहित याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
0 Comments