म्हाडा, आरोग्य आणि TET घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे?

 पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि TET परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते आणि या प्रकरणी सगळे कागदपत्र मागवली होती. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे पाठवली आहेत.

म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. या घोटाळ्यात लाखो रूपयांची उलाढाल झाल्याचं उघड झालं होतं. त्याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकारी तुकाराम सुपे यांचा म्हाडा पेपरफुटी घोटाळ्यात हात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर या घोटाळ्यात अनेकजणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यातील या सर्वांत जास्त गाजलेल्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाली का? याचा शोध ईडीकडून घेतला जाऊ शकतो. या प्रकरणी ईडीकडून कागदपत्रे मागवून घेतली असून पुढील तपासात या तिनही घोटाळ्यातील नवे प्रकरणे बाहेर येऊ शकतात. या तपासात घोटाळ्याच्या प्रकरणाला नवे वळण लागू शकते.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e