महिला पोलिसाने मागितली १ लाखाची लाच; लाचलुचपत विभागाकडून अटक

रायगड : चोरीच्या गुन्ह्यातुन वाचण्यासाठी महिला पोलिसाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतच्‍या तक्रारीवरून  लाचलुचपत विभागामार्फत महिला पोलिस कर्मचारीस अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमधील ही घटना आहे.
चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करून बाहेर काढण्यासाठी महिला  पोलिस कर्मचारी हिने एक लाख रुपयांच्या लाचेची  मागणी केल्या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये समोर आले आहे. या प्रकरणी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या महिला पोलिस कर्मचारी हिस अटक करून चौकशीची कारवाई सुरु केली आहे. कुंजन धर्मेश जाधव (वय 32) पोलीस नाईक, नेमणुक माणगाव पोलिस ठाणे असे या आरोपीत महिला पोलिस कर्मचारी हिचे नाव आहे.

तडजोडीअंती ९० हजार रूपये

फिर्यादीच्या चोरीच्या गुन्ह्याच्या पडताळणीचे वेळी आरोपी हिने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 90 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. यावरून सदर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e