सगळा प्रकार पुण्यातील सासवड रस्त्यावरील वाईन एन्टरप्रायझेस नावाच्या गोडाऊनमध्ये घडला. या गोडाऊनमध्ये संतोष केशवे (वय 33, रा. शेवाळेवाडी) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांनी सायंकाळी सहा वाजता संबंधीत गोडाऊन बंद केले. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनच्या पाठिमागील भिंत फोडली आणि गोडाऊनमध्ये ठेवलेली विविध कंपन्यांचे वाईन बॉक्स असलेली खोकी चोरुन नेली.
चोरट्यांनी गोडाऊनमधील तब्बल १२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे वाईन बॉक्स पळवून नेले आहेत. केवळ तेवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारी डिव्हीआर यंत्रणा देखील चोरुन नेली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
0 Comments