जुनवणे गावात दोन दिवसांपासून कानूबाईच्या उत्सवामुळे आनंदाचे वातावरण होते. कानूबाई विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर जवळील नदी पात्रातील बंधाऱ्यात विसर्जन झाल्यानंतर नैतिक नदीजवळ पाण्यात पाय घसरून बंधाऱ्यात बुडू लागला. या वेळी काठावर असलेल्या अनेकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. गावातील पन्नासपेक्षा जास्त तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र तलावातील गाळामध्ये तो फसल्याने त्याला काढणे अशक्य झाले.
बांध कोरल्यानंतर सापडला मृतदेह
जेसीबीच्या सहाय्याने मातीचा बांध कोरण्यात आला, पाणी कमी झाल्यावर नैतिकचा शोध लागला, त्याला तातडीने धुळे येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नैतिकचे वडील कमलेश सुभाष पाटील शेतकरी आहेत. नैतिक बोरकुंड येथील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत होता. तो वडिलांना शेतीकामातही नेहमीच मदत करत असे. त्याला एक मोठी बहीण रितू, आई व आजी असा परिवार आहे. कानूबाईच्या उत्सवासाठी त्याने आईला घराच्या स्वच्छतेत मदत केली.
0 Comments