पुण्यातही ७ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण
काल पुणे शहरातून धक्कादायक वृत्त समोर आले होते. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ७ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक घटना समोर आला होता. सदर घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय चिमुरडीच्या वडिलांचा स्टेशन परिसरात चहाचा स्टॉल आहे. दुपारी ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली. डबा देऊन परत येत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. त्यानंतर फलाट क्रमांक सहाच्या भिंतीजवळ असणाऱ्या कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील बंद असणाऱ्या खोलीत नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या अज्ञात आरोपीने चिमुरडीला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, लघुशंकेच्या बहाण्याने ही मुलगी बाहेर गेली आणि त्याच्या तावडीतून सुटली.
0 Comments