ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्यासह त्यांच्या मित्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचा केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप आहे. या बलात्कार पीडित महिलेने केदार दिघे यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसात जाऊन केली. त्यानंतर पीडित महिलेच्या जबानीवरून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्या त्यांच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेने ठाण्यातील दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर ठाण्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या केदार दिघे यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
0 Comments