नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 40 जखमी

नाशिक : नाशिकच्या बागलाण येथील बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला दोधेश्वर घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे 40 विद्यार्थी जखमी  आहेत. जखमींपैकी 15-16 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश बाप्पू कन्नोर असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मालेगाव तालुक्यातील निमशेवडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सर्व विद्यार्थी दोधेश्वर येथे बंदोबस्तासाठी गेले होते. अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप मंगळ बोरसे आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्रावणी सोमवार असल्यामुळे दोधेश्वर येथे बंदोबस्तासाठी हे विद्यार्थी गेले होते. काही जखमींना सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बंदोबस्ताहून परतत असताना ट्रॅक्टर पलटी झाला

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दोधेश्वर घाटात बागलाण अकॅडमीचे हे विद्यार्थी बंदोबस्तासाठी गेले होते. बंदोबस्तानंतर परतत असतानाच घाटातच त्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 40 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये 15 ते 16 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दोधेश्र्वर येथे जात असतात. त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांची बंदोबस्तासाठी मदत होत असते.

बागलाण अकॅडमी ही सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. दोधेश्वर येथे प्राचीन महादेवाचे मंदिर असून, श्रावणात दर सोमवारी येथे यात्रा असते. या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे येथे बंदोबस्तासाठी बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. मात्र बंदोबस्तासाठी त्यांना कुणी आणि का पाठवले त्याबाबतीत प्रशासकीय खुलासा अद्याप मिळाला नाही

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e