नागपूर : धान्य खरेदी केल्यावर त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्याचे चक्क अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी कारवाई करीत व्यापाऱ्याची सांगलीतून सुटका केली. याशिवाय दोघांना अटकही केली आहे.
प्रवीण चव्हाण असे आरोपीचे नाव असून त्याचा साथीदाराही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण वसंतभाई तन्ना (वय ३७ रा. वाठोडा) हे धान्य व्यापारी आहेत. त्यांनी सागंली येथे असलेल्या प्रवीण यांच्याकडून ३९ लाख रुपयांचा मणुका खरेदी केला. दरम्यान बराच कालावधी निघून गेल्यावरही भूषण वसंतभाई तन्ना हे त्यांना पैसे परत केले नाही. दरम्यान प्रविण चव्हाण यांनी वारंवार संपर्क केला असता ते टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी १४ ऑगस्टला सकाळी प्रवीण व त्याचे साथीदारांनी नागपूर गाठले. त्यांनी नागपुरात प्लॉटखरेदी करायचा असल्याचे सांगून प्रवीणने भूषण यांना गणेश टेकडी मंदिर परिसरात बोलाविले. भूषण तिथे येताच, त्याला प्रवीणने पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यातून प्रवीण व त्याच्या साथीदारांनी भूषण यांना बळजबरीने कारमध्ये बसवित सांगलीला घेऊन गेले
दरम्यान भूषण यांच्या पत्नी श्वेता यांनी भूषण यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मोबाइल बंद होता. सोमवारी श्वेता यांनी पुन्हा संपर्क साधला. पान २ वर
आम्ही पोलिस असून, फसवणूक केल्याने भूषण यांना सांगलीला आणण्यात आल्याचे प्रवीणने श्वेता यांना सांगितले. मंगळवारी (ता.१७) श्वेता यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत सांगली पोलिसांना माहिती दिली. तसेच आपले पथकही सांगलीकडे रवाना केले. सांगली पोलिसांनी भूषणची सुटका करीत, प्रवीण व त्याच्या साथीदाराला अटक केली. गुरुवारी पोलिसांचे पथक तिघांना घेऊन नागपुरात पोहोचतील.

0 Comments