कोचिंग क्लासहून परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारची राजधानी पाटणा येथून समोर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घडलेल्या या घटनेनंतर बिहारमध्ये पुन्हा माफिया राज सुरू झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असून, सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीव आला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, प्रेमप्रकणातून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी मोहल्ला येथून कोचिंग क्लासहून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर अचानक मागून येणाऱ्या अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये मुलीच्या मानेला गोळी लागली. घटनेनंतर मुलीला तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान ही, घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अद्याप पोलिसांनी संशयिताला अटक केलेली नसून तो फरार आहे. या घटनेमागचा हेतू अद्याप समजू शकलेला नसून घटनेचा तपास सूरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

0 Comments