धक्कादायक: २४ वर्षीय युवकाने केला शिक्षिकेवर धारधार शस्त्राने हल्ला; प्रकृती गंभीर

यवतमाळ: यवतमाळच्या शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नायगाव (बु) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर एका २४ वर्षीय माथेफिरूने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैशाली चल्लावार (४०) असं जखमी शिक्षिकेचे नाव आहे. तर घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला शिरपूर पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या शिक्षिका कार्यरत आहेत. त्या आपल्या परिवारासह चंद्रपूरला ये-जा करतात. सदर शिक्षिका शाळा सुटल्यावर आपल्या गावी म्हणजे चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

नायगाव फाट्यावर त्या बस किंवा अन्य प्रवाशी वाहनाची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरु युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्लात शिक्षिकेच्या कानाला जखम झाली आहे. शिक्षिकेची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला  हलविण्यात आले आहे.

हल्लेखोर माथेफिरु युवक स्वतः चे नाव राजू अन्सारी सांगत असून त्याचे जवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e