नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील बेडकी पाडा गावातील एका शेडमध्ये चालणाऱया अवैध जुगार अड्यावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात 7 लाख 23 हजारांची रोडक आणि चार महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक आणि नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
६० जणांना अटक
यामध्ये जुगार खेळणाऱ्या जवळपास पन्नास पुरुष आणि चार महिलांसह सर्व्हीस देणाऱ्या दहा जणांना देखील अटक करण्यात आली आहे. आज भल्या पहाटे गोपनीय पद्धतीने पोलीसांनी हे छापा सत्र राबविले आहे. या छाप्यानंतर सीमावर्ती भागातील अवैध धंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे छाप्यात गुजरात राज्यातील अनेक जुगारी अडकले आहेत.
0 Comments