औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका पत्रकाराने महिलेचा गळा चिरून हत्या केली आहे. शहरातील हडको कॉर्नर डिमार्ट जवळ एका खोलीत महिलेचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता श्रीवास्त असे मृत महिलेचा नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. तर सौरभ याचा विवाह झालेला आहे. दरम्यान सौरभकडे मयत महिलेने लग्नाचा तकादा लावल्याने रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरून खून केला असल्याचं बोलले जात आहे. हत्या केल्यानंतर सौरभ याने महिलेचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाला असताना देवगाव पोलिसांनी त्याला पकडले.
खून केल्याची माहिती टाकली व्हाट्सअप ग्रुपवर...
सौरभ हा पत्रकार असून स्थानिक दैनिकासाठी काम करतो. त्याने महिलेची हत्या केल्यानंतर मी खून केला असल्याची माहिती पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यांनतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहिती सुद्धा ग्रुपवर टाकली.
0 Comments