आरोपी बाहेरचे कसे?
यावेळी तीन पीडित मुली तेथे आढळल्या. रंजीत रमेश हलदर (वय 41 रा. हेदेगौडा, पश्चिम बंगाल) व गोरंगा बिस्वास (वय 45, रा. मुंबई) हे दोघेही या सलूनचे मालक आहेत. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून ते देहव्यापारात ओढत व त्यांना सलुनमध्येच देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करुन द्यायचे. हे दोन्ही मालक बाहेरचे असल्याबाबतही विविध चर्चांना उधाण आहे. याचा खरा मालक दुसरा असून हे दोघे फक्त त्याच्यासाठी काम करत असल्याची चर्चा आहे.
विविध राज्यातील मुलींचा वापर
देहव्यापारासाठी पश्चिम बंगालसह विविध राज्यातील मुली येथे आणायचे. पॉश भागात हा प्रकार सुरू असूनदेखील अनेकांना संशय आला नव्हता. पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त चिन्मय पंडीत, सहायक पोलिस आयुक्त माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे आदींनी ही कारवाई केली.
इतर भागातही 'रॅकेट' जोरात
काही वर्षांपूर्वी शहरात गुन्हे शाखेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवरील कारवाईचा सपाटा लावला होता. तसेच अनेक देहव्यापाराचे अड्डे बंद केले होते. मात्र सध्या बोटावर मोजण्याएवढ्याच कारवाईसुरु आहेत. मात्र दुसरीकडे देहव्यापाराचे जाळे शहरातील पॉश एरियापासून तर ग्रामीण भाग असलेल्या मनीषनर, बेसा, बेलतरोडी भागापर्यंत पसरले आहे. त्यामुळे या अड्ड्यांवर पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे.
0 Comments