आवाज उठविल्यास कमी करण्याची धमकी
व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याकडून नांदुरुस्त गाड्यांचे वेळेत मेंटेनन्स न करणे. तसेच गाड्या दुरुस्तीच्या नावाखाली आणि डिझेल व स्पेअर पार्ट याबाबत मोठी गफलत केली जात आहे. ज्या पायलट आणि डॉक्टरांनी याबाबत आवाज उठवला की त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे आदी प्रकार घडत आहे. सदर व्यवस्थापकाला वरिष्ठांनी कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले असता ज्यांनी कामावर घेण्याची विनंती केली त्यांच्याच बरोबर दुजाभाव करून मोठी अफरातफर केली जात असल्याचे समोर आले आहे.
जवळच्या व्यक्तींना कामावर रुजू
जिल्ह्यात जवळपास निम्म्या रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी अतिरिक्त पायलट व डॉक्टर नसतानाही दुसऱ्याच्या नावावर हजेरी भरून पेमेंट काढणे आदी काम व्यवस्थापकाकडून केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. गेल्या आठ– दहा वर्षापासून कामावर असलेल्या रुग्णवाहिका चालकांना कामावरून काढून टाकत त्याच्या जवळच्या व्यक्तींना कामावर रुजू करणे, जवळच्या व्यक्तींचा पेमेंट वेळेत व जास्त दिवसांची हजेरी लावून अधिकचा पेमेंट काढणे, तसेच दुर्गम भागात अतिरिक्त पायलट नसतानाही डोंगरदऱ्यातील दरड कोसळत असलेल्या रस्त्यांवर रात्री अप त्री २४ तास सेवा देणाऱ्या पायलट व डॉक्टरांना मुद्दाम त्रास देणे. आदी कामे व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याद्वारे केली जात असून; वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मोलगी येथे अतिरिक्त चालक नसतानाही दुसऱ्याच्या नावावर पेमेंट काढले गेले. तसेच त्याने २४ तास ड्युटी केली असतानाही त्याला कमी पेमेंट दिले गेले. धडगाव व बिलगाव येथील १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसतानाही स्वॅप कार्डने डिझेल भरले जाते. तसेच धडगाव येथील कॉल असल्यावर मोलगीची गाडी मागवून शहादा २०० किलोमीटर फेरा मारायला लावत आहे. याबाबत विचारणा केली असता व्यवस्थापक निलेश पाटील यांनी कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत व्यवस्थापकावर कारवाईची मागणी पायलट शंकर तडवी यांनी केली आहे.
0 Comments