नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक बोरस्ते यांची दुचाकी क्रमांक एम एच १५ एफ एल ६८८७ काठे गल्ली येथून शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीस गेली होती. रविवार अज्ञात संशयीताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यात चोरीच्या दुचाकीसह तरुण-तरुणी आढळून आले होते. त्या आधारे गुन्हेशोध पथक तपास करत होते.
सोमवार रोजी पथकातील सागर निकुंभ आणि धनंजय हासे यांना संशयित बंटी बबली अर्थात विराज प्रदीप काळे आणि त्याची अल्पवयीन प्रियसी दोघे जेलरोड परिसरात चोरीच्या दुचाकीवर मौजमजा करत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी जेलरोड परिसरातून दोघांनाही ताब्यात घेतले. प्रेयसीच्या मौजमजेसाठी संशयिताने त्याच्या स्वतःची दुचाकी गहाण ठेवून पैसे घेतले होते. त्या पैशातून दोघांची हाऊस भागवण्यासाठी काठेगल्ली येथून दुचाकी चोरल्याची कबुली संशयिताने दिली.
दोघेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने ते पोलिसांच्या हाती लागू शकले. त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक होते. अन्यथा भविष्यात त्यांच्याकडून अशा प्रकारे चोरी करण्याचे प्रकार वाढले असते. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. अशात केवळ त्यांच्याकडून जीवाची मुंबई करण्यासाठी चोरी केली जात असल्याचे त्याने सांगितले. चौकशी दरम्यान दुचाकीसह त्याच्याकडून चोरीचा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
0 Comments