४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न; विवाहित तरुणीने उचलले धक्कादायक पाऊल

चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या एका पोलीस  शिपायांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पोलीस कुटुंबियांवर गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

युक्ता संकपाळ ( वय २०) असे या मयत तरुणीचे नाव असून ती पती हर्षद संकपाळ (वय २३) याच्यासोबत चेंबूर कॉलनी येथे राहत होती. युक्ता आणि हर्षदचे वडील दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे लग्ना पूर्वी हर्षद आणि युक्ता दोघेही चेंबूर पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. याच याच ठिकाणी दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

दोघांनी कुटुंबीयांकडे लग्नाचा हट्ट धरला. मात्र हर्षदचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी दोघांनी वांद्रे न्यायालयात विवाह केला होता. त्यानंतर दोघे चेंबूर कॉलनी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र २६ जुलैला अचानक युक्ता घरात एकटीच असताना तिने घरात गळफास लावून आत्महत्या केली.

युक्ताला तिचा पती नेहमी मारहाण करत होता. शिवाय सासू-सासरे आणि नणंद देखील तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. शिवाय मृत्यूपूर्वी युक्ताने मोबाइलमध्ये आत्महत्येचे कारण देखील लिहून ठेवले आहे.

त्यानुसार पोलिसांनी तपास करत बुधवारी पती हर्षद संकपाळ, सासू शैलजा संकपाळ, सासरे भरत संकपाळ आणि नणंद रोशनी या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e