धुळे शहरात पाण्याची समस्या आजही कायम आहे. पाण्याच्या समस्येसाठी नागरीकांनी अनेकदा आंदोलन केले. तरी देखील प्रशासनाकडून अजूनपर्यंत तोडगा काढलेला नाही. आठ ते दहा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे केला जात असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळेच धुळे शहरातील वाडी भोकर रोड परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून परिसरातील नागरिकांनी अनोख्या पद्धतीने शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
0 Comments