अडीच लाख आणून दिले तरीही..
गेल्या काही दिवसांपासून जयश्री नागे यांना निवडणुकीसाठी ५ लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी तगादा लावला होता. माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुध्दा जयश्री हिने २ लाख ५० हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटले होते. परंतु, पुन्हा उर्वरित २ लाख ५० हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. तर पती आशिष नागे ती माहेरी गेली असतानासुध्दा मोबाइल फोनद्वारे पैसे आणण्यासाठी धमक्या देत होता. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप नंदा साबळे यांनी केला आहे. तशी तक्रार उरळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. या तक्रारीनुसार सासरच्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.
मुलगी झाली म्हणूनही छळ
जयश्रीला १० मे रोजी मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तिच्या नागे कुटुंबीयांनी अतोनात छळ केला होता. तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जाणीवपूर्वक त्रास देऊन जयश्री यांना पती आशिष नागे यानेसुध्दा मारहाण केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
0 Comments