बीड-परळी महामार्गावरील सिरसाळा परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात हॉस्पिटलमध्ये जात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या दिंद्रूड येथील महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या त्यांच्या ९ वर्षीय मुलासह हॉस्पीटलमध्ये जात असताना बीड-परळी महामार्गावरील सिरसाळा परिसरात दोन कारचा अपघात झाला. हा अपघात येवढा भीषण होता की या दोन्ही कार रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यामध्ये एकमेकांवर पडलेल्या स्थितीत आढळल्या आहेत.
अपघातामध्ये महिला पोलिस (Police) कर्मचारी कोमल शिंदे त्यांचा ९ वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे आणि डॉ. इलियास यांचा समावेश आहे. अपघातातीमध्ये जखमी झालेल्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर या अपघाताचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
मागील काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात हा गांभीर्याने घेण्याचा मुद्दा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर चर्चेत आला होता. याबाबत योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन सरकारने दिलं असलं तरी देखील अपघातांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये.
गणेश भक्तांच्या गाडीचा अपघात तीन ठार -
आज बीडमध्ये झालेल्या अपघाताच्या आधीच आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि एका कारचा भीषण धडक झाली आहे. हा अपघात पोलादपुर शहरानजीक झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले असून जखमींवर पोलादपुरच्या ग्रामिण रुग्णालयात प्रथोपोमोपचार करून त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. मुंबईहुन सावंतवाडीला जात असताना गणेश भक्तांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.
0 Comments