औरंगाबाद मध्ये नामांकित पगारिया ऑटोमध्ये दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने 15 लाखांची रोकड लंपास केली होती. औरंगाबाद शहरातील पगारिया ऑटो हे सर्वात मोठे वाहन विक्रीचे शोरूम आहे. या शोरुमचा दरवाजा उचकटून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला होता. तसेच पाठीमागील बाजूस असलेल्या दोन तिजोऱ्यातुन तब्बल 15 लाख रुपये पळवून घेऊन गेले होते.
घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसाच्या गुन्हे शाखेने कसून तपास करत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली आहे. तसेच या चोरट्यांच्या ताब्यातून 4 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
औरंगाबादमध्ये नशेखोर तरूणाचा राडा -
औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. काही काळ सिडको भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नशेखाराला पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी मिळून तरुणाला जेरबंद केले. यावेळी संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणत पुढील कारवाई केली.
0 Comments