शारीरिक संबंधांना तरुणीचा नकार, नाशिकमधील पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल करून विनयभंग

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून हत्येच्या घटनाही समोर येत आहेत. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरीर सुखाची मागणी केल्यानंतर नकार दिल्याने तरुणीचे धक्कादायक कृत्य करण्यात आले. या तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 जुने ते 19 सप्टेंबर या कालावधीत घडली असल्याचे समजते. संशयित रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. मात्र, आरोपीच्या या मागणीला पिडितेने नकार दिला. यानंतर संशयित रोहन बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

इतकेच नाही तर त्याने तिचे अश्लील फोटो आणि मॅसेज मोबाईल फोनच्या माध्यमाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणी आणि भाऊ व बहिणी यांना पाठवले. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरुन रोहन बंजारा याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.

गोंदियातील देवरी तालुक्याच्या तुमडीमेंढा येथील एका तरुणाचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आला. दिलीप संतराम अरकरा (वय 35) असे या विवाहित तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना अटक केली. तसेच सोमवारी अटक करून त्यांना चिचगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दिलीप संतराम अरकरा याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रतिराम दशरथ कुंभरेला होता. त्यामुळे आरोपी रतिराम कुंभरे याने आरोपी छेदीलाल कारुजी आचले आणि मोतीराम पांडुरंग नेताम (सर्व रा. तुमडीमेंढा) यांच्या मदतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून दिलीप अरकराची हत्या केली.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e