खाजगी ट्रॅव्हल्स– ट्रकचा भीषण अपघात; तीण जण ठार, 17 गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली आहे. या  अपघातात तीण जण ठार तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्‍या नवीन बसस्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. ट्रकमधील मजुर हे ऊस तोडणीसाठी  सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्समध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरातकडे जात होते 

जखमी रूग्‍णालयात दाखल

ट्रॅव्‍हल व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात तीन मजूरांचा जागीच मृत्‍यू झाला. तर अन्‍य १७ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच शहादा पोलीसांच पथक घटनास्थळी दाखल झाले असुन तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e