आरोपीच्या सुटकेसाठी महिलांनी कोर्ट परिसरात अंगावरचे कपडे काढले

बीड: बीड जिल्हा  न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी आलेल्या आरोपी महिलेसह चार ते पाच नातेवाईक महिलांनी न्यायालयाच्या आवारातच अंगावरील सर्व कपडे काढून तब्बल अर्धा तास गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. आरोपी महिलेने काही गुन्हा केला नाही तिला सोडून द्या अशी मागणी नातेवाईक करत होते. 

न्यायदेवतेच्या मंदिरातच महिलांनी विवस्त्र होवून गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी  गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंधळ घालणाऱ्या सर्व महिला आदिवासी पारधी समाजाच्या असल्याचा पोलिसांनी सांगितलं आहे.

बीडच्या कोर्टात साक्ष घेण्यासाठी एका आरोपी महिलेला हजर करण्यात आले होते. औरंगाबाद  पोलिस तिला घेऊन जात असताना त्या महिलेच्या इतर चार पाच महिला नातलगांनी आपल्या अंगावरील कपडे काढून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा गोंधळ तब्बल तीस ते चाळीस मिनिटे सुरू होता.

महिलांनी घातलेल्या गोंधळानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिसांनी सदरील महिलांना ताब्यात घेतले शिवाजीनगर ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांना आणि दंगल नियंत्रण पथकाला पाठवले. त्यानंतर महिला पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्या महिलांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e